Tag Archives: शास्त्रीय संगीत

पंडित अनिन्दो चटर्जी : एक रम्य संध्याकाळ…..

आमची पिढी खरे पाहता तबला सोलो बैठकी ऐकण्याच्या बाबतीत फारशी नशीबवान नाही. अगदीच थोड्याफार मेह्फिली होतात. त्यातल्याही काहीच पुण्यात. तबल्याची जादू, लेह्र्याची नजाकत, चक्रधार हे सगळं कधी प्रत्यक्ष ऐकायला मिळेल कि नाही असे वाटायचे. पण इच्छा प्रामाणिक असल्या, कि त्या पूर्ण होतात हे हरिप्रसाद चौरासिया यांनी एकदा मला सांगितले होते. त्याचीच प्रचीती परवा अलि.

पंडित अनिन्दो चटर्जी यांना कित्येक मान्यवरांना साथ करतांना अनेकदा ऐकले आहे. पुण्यात त्यांच्या एकाल वादनाचा कार्यक्रम आहे हे कळतच पाय तिकडे वळले. मी कमीत कमी १० गावांमध्ये वाढलो आहे. वडलांची फिरतीची नोकरी यास कारणीभूत. हे मला पण प्रामाणिकपणे मान्य करावेसे वाटते कि पुण्यासारखे रसिक कुठे नाहीत. खरच नाहीत. साडे नौ चा  कार्यक्रम. तिकीट विक्री रात्री नऊ वाजता सुरु होणार होती. मी प्रतिसादाबद्दल साशंक होतो. पण अर्ध्या तासात सभागृह पूर्ण भरले.

सुरुवातीस अर्धा तास अनींदो चटर्जी यांना काही प्रश्न विचारण्यात आलेत. त्या प्रश्नांच्या उत्तरांमधून त्यांचा विनम्र स्वभाव आणि गुरुजनान्विषयी असणारा आदर लगेच दिसला. एवढा मोठा कलाकार पण श्रोत्यांची परवानगी आहे का अशी विचारणा सुरुवातीस करतो हे बघून खरच सुंदर वाटलं.

त्यांनी सुरुवात केली ती रुपक तालाने. सात मात्रांचा हा ताल खरच मनाला वेद लावतो. पेटीवर हात पडताच दाद उठली. संथ पण अतिशय तेजपूर्ण पद्ध्तीने अनिन्दो जींनी वादन सुरु केले. त्यांचा स्थिर हाथ खरच विशेष आहे, वेगळा आहे. लय वाढू लागली. रचना अधिक अधिक कठीण होत गेल्यात. पण स्थैर्य, स्पष्टता तशीच होती. नंतर पंडितजींनी तीनताल वाजवला. आपल्या एका शिष्याला देखील त्यांनी मंचावर बोलावून तालीम दिली. समता प्रसाद त्याचबरोबर अन्य कितीतरी मान्यवरांच्या रचना त्यांनी सदर केल्यात.

रात्री साडे बारा पर्यंत ही ताल यात्रा सुरु होती. माझी इच्छा खरच पूर्ण झाली. लेहरा, तानपुरा, पेशकार, कायदे, रेले, चक्रधार…..

3 प्रतिक्रिया

Filed under नाद ब्रह्म

झनन झनन झनन पायल बाजे…….

झनन झनन झनन पायल बाजे……

बाजे रे….

सुन पावे मोरी सास ननंदिया

और जागे तुझ जेठानिया

जयजयवंती रागातील पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली हि अतिशय नाजूक आणि सुरेल बन्दीश.बंदिशीचे शब्द ऐकताच अतिशय विरहाच आणि शृंगाराच वातावरण निर्माण होतं.पण का तर काय माहित,मला हि बंदिश खूपच अध्यात्मिक वाटते.तसंही अध्यात्म हे प्रेमाशिवाय काही वेगळे नाही.पण या बंदिशीतली पैंजणांची झनन झनन हि मला कबीराच्या निर्गुणी भजनातील झिणी झिणी प्रमाणे वाटते……..

सासूची जावेची भीती हि नवख्या प्रेमींना असते.त्याचप्रमाणे अध्यात्माच्या रस्त्यावर चालणार्या नवख्या लोकांना पण सर्व नाते संबंध,बंधनं यांची भीती वाटत असते.कित्येक वेळा प्रियकर प्रेयसीला जसे लपून भेटायला जातात तसे लोक भक्ती देखील लपून करतांना आढळतात.या जगात दोन प्रकारचे लोक फार छळल्या गेले आहेत.एक म्हणजे प्रेमी आणि दुसरे म्हणजे ईश्वराचे प्रेमी.तसा या दोघांमध्येही काहीच फरक नसावा,कारण कि जग दोघांनाही सारख्याच पद्धतीने वागवते

प्रतिक्रिया नोंदवा

Filed under नाद ब्रह्म, विश्वाचे आर्त