Category Archives: सहज

प्रेमाची दयनीय अवस्था

प्रेम आणि दयनीयता या शब्दांचा खरे पाहता काहीच संबंध नाही. जो माणूस प्रेमात असतो तो दयनीयतेपासून दूर असतो. प्रेम माणसाची दयनीयता मिटवते. पण आज समाजात उलटंच चित्र दिसते. प्रेमात पडलेला माणूस खरच दयनीय असतो. गेल्या काही वर्षात कित्येक प्रेमी पाहिलेत, कित्येक प्रेम प्रकरणे पहिलीत. पण प्रेमात पडलेला एकही मित्र मला मला खूश दिसला नाही. काही प्रेमाची अवस्था इतकी दयनीय असावी?

सर्व प्रथम, ज्याला आपण प्रेम म्हणतो, ते प्रेम नव्हेच. हल्ली लोकं एकाकीपणा घालवायला प्रेमात पडतात.किंबहुना, एकटे राहण्याची लोकांची तयारी नसते. म्हणून ते प्रेम शोधतात. आजची आमची पिढी त्रस्त आहे. जगात ताण  तणाव  निर्माण करणाऱ्या खूप गोष्टी आहेत. आणि मग कोणीतरी हे सगळं समजून घ्यावं असं वाटतं. कोणीतरी असं लागतं ज्याला हे सगळं सांगत येईल. इथून प्रेमाची सुरुवात होते.

आज ९०% उदाहरणांमध्ये प्रेम हे प्रेमातून नाही, तर मानसिक दौर्बल्यातून उदयास येते. आज समाजात तरुणांची जी दयनीय अवस्था दिसून येते, तिला जबाबदार प्रेम नाही, तर मानसिक दौर्बल्य आहे.

3 प्रतिक्रिया

Filed under सहज

पहाटेची भैरवी…..

काही गोष्टी आपल्या लवकर लक्षात नाही येत,पण आल्या लक्षात कि खूप विचार करायला लावतात.पुण्यात क्वचित सकाळी वासुदेव येतो.गाणं गाऊन जातो.सकाळच्या शांत वेळी तो कणखर आणि मुरलेला आवाज….एक वेगळीच हुरहूर लावून जातो.
आजही खिडकीतून सकाळी आवाज ऐकू आला तो वासुदेवाचा.सहज विचार केला कि हा राग कुठला.आणि पुढच्या क्षणी लक्षात आले-हि तर भैरवी.हा केवळ योगायोग नसावा कि वासुदेवाच गीत हे भैरवीत असते.पहाटेची हि भैरवी कदाचित मानवाला जाणीव करून देत असावी कि शेवट जवळच आहे.माणूस सपशेलपणे विसरतो कि अंत येणार आहेच.किंवा हि मानवाची वृत्ती असावी.ज्या गोष्टीला तो घाबरतो ती विसरण्याची.मृत्यू हे जगातील खूप मोठे सत्य आहे आणि माणूस त्याचाच विषय टाळत असतो.
दररोज सकाळी वासुदेव त्या करताच येत असावा.मृत्यूच्या रोज आपण थोडं थोडं जवळ जात आहोत हे दाखवून देत असावा.मृत्यूकडे कानाडोळा केला तरी तो काही सोडणार नाही.काळाच्या गतीला आपण जरी विसरलो तरी ठोके देणारा ‘तो’ काही थांबणार नाही.त्याचा ठोका कधी चुकणार नाही.शहामृग संकट आले कि मन वाळूत खोचून टाकते.जणू काही त्याला संकट दिसत नाही याचा अर्थ संकट नाही असाच होतो असा त्याचा समज.माणूस पण एक शहामृग आहे.कामाच्या व्यापात मान खोचून मृत्यूकडे कानाडोळा करणारा आणि आपण मृत्यूला चुकवले आहे असे समाधान
मानणारा.हि पहाटेची भैरवी कदाचित हेच शाश्वत सत्य कानावर घालत असावी.

प्रतिक्रिया नोंदवा

Filed under नाद ब्रह्म, विश्वाचे आर्त, सहज

अपूर्णतेची गोडी………

पंडित शिवकुमार शर्मा बोलत होते-”वाजवत वाजवत केवळ एका क्षणाकरिता मी ‘त्या’बिंदूपर्यंत पोहोचतो आणि पुढच्या क्षणी लगेच खाली येतो.तो एक क्षण मला दाखवून देतो कि किती अपूर्ण आहे मी आणि त्या अपूर्णतेची गोडी अनुभवत अनुभवत साश्रू नयनांनी मी संतूर वाजवू लागतो.”

मानवाला त्याच्या अपूर्णतेची जाणीव करून देणे हेच माझ्या मते कुठल्याही केलेचे अंतिम ध्येय.हाच कुठल्याही कलेतून होणारा अंतिम साक्षात्कार.कबिर म्हणतो -”जो कि त्यो धर दिनी, दिनी चदारीया”.या एका वाक्यातच अमाप सौंदर्य आहे.कबीर म्हणतो कि हि ईश्वराने दिलेली चादर मी जशीच्या तशी त्याला वापस करतो आहे.कबीर देखील या अपूर्णतेत समाधानी आहे.आणि सगळे जग आहे ते  पूर्णतेच्या ध्यासात.कळी उमलण्याच्या ध्यासात,पालवी वृक्ष होण्याच्या ध्यासात.हि पूर्णत्वाची इच्छा हे जग चालवते.

माणूस पूर्णत्वाच्या शोधात असतो आणि जे लोक पूर्ण आहेत अश्या लोकांच्याही.पण खरी गोष्ट अशी आहे कि ज्यांनी पूर्णत्वाचा ध्यास सोडला आहे त्यांनाच आपण पूर्ण म्हणत असतो.पूर्णत्वाच्या मागे वेड्यासारखे धावून,सगळे मार्ग चालून आणि जोखून मग यांना कळून येतं,कि अपूर्ण राहण्यातच खरी गम्मत आहे.

खरी गोडी आहे ती या अपूर्णतेतच…….

3 प्रतिक्रिया

Filed under नाद ब्रह्म, विश्वाचे आर्त, सहज

सॉरी…..घेतो ना मी………..

कालचीच गोष्ट.खूप दिवसांपासून वाचन बंद होतं. काहीतरी घ्यावं वाचायला,वाचावं असं कितीतरी दिवसांपासून मनात येत होतं.मी मित्रासोबत निघालो आणि अतिशय प्रतीश्ठीत अशा Manney’s Booksellers कडे गेलो.नट हम्सन ची काही सुंदर पुस्तके घेऊन आम्ही बाहेर निघालो.

आता गरज होती ती काहीतरी खायची.जी माझी पुस्तकानंतरची दुसरी प्राथमिक गरज असते.जवळच असलेल्या एका अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर अशा एका होटेल मधे आम्ही पोचलो,काही कारणांमुळे नाव मात्र मी नाही सांगणार.आपल्याजवळील सर्व समान चेक इन करा अशी सूचना होती.आम्ही आत प्रवेश करताच माझ्या मित्राने होटेल मधील एका कर्मचाऱ्याला (जो कि सगळ्यांच्या ऑर्डर घेत होता)त्याच्याकडे पुस्तकांची पिशवी चेक इन करायला दिली.त्या माणसाने अतिशय घाईघाईतच ती पिशवी उघडली आणि आम्हाला बसायला सांगितले.आपली पिशवी त्यांनी इतक्या घाईघाईत का उघडली याचा विचार करतच बॉम्ब वगरे तर नसेल ना सापडला असा पाचकळ विचार करत मी जागेवर बसलो.

थोड्या वेळानीच ते सद्गृहस्थ आमच्या पुस्तकांसोबत परत आलेत.”झालं चे इन?”मी त्यांना थोड्या काळजीनेच विचारले.”keep the check-in aside.I was very curious to know what Manney’s books you boys had”.अजून थोडावेळ पुस्तकं चाळून त्या ‘वेटर’ नि आमची ऑर्डर घेतली.ऑर्डर लगेचच आली.”मी तुम्हाला सर्व करतो” असं ते गृहस्थ म्हणताच मी गहिवरलो.”सॉरी,……पण घेतो ना मी”,एवढच मी बोलू शकलो.

१ प्रतिक्रिया

Filed under सहज

प्रेम विकणे आहे: अल्प दरात

जगात असे कितीतरी शब्द असतात कि माणसांनी ज्यांचा अक्षरशः अपमान केला आहे.याच सर्व शब्दांतला एक शब्द म्हणजे प्रेम.प्रेम हल्ली फारच स्वस्त झालं आहे.इतकं कि २० वर्षाचे होईपर्यंत लोक चार पाच वेळा प्रेमात पडलेले असतात.लोकांना प्रेम उमजायला आयुष्य वेचावं लागतं असं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतं.पण हल्लीची हि सगळी गम्मत बघता प्रेमाची अत्यल्प दरात विक्री होत असावी असच वाटून राहिलं आहे.

अरे लेका मंदार,काय सांगू तुला,लई भारी आहे पोरगी…………अरे तशी चांगली आहे पण जरा विचित्रच आहे………….कशी का असेना,दिसायला कडक………..नुसतं दिसणं काय चाटणार?माणसाला मन हवं रे मंद्या……….बघू,विचार चालू आहे हि कि ती………..हल्ली माझं आणि हिचं,पटतच नाही……..ब्रेकअप….परत नवी पोरगी….नवे कौतुक….नवे प्रेम….नवी गाऱ्हाणी…आणि परत नवा ब्रेकअप……

या दोन महिन्यात मी चार ब्रेकअप पाहिलेत.अगदी जवळच्या लोकांचे.आधी फार वाईट वाटायचं पण आता फक्त खंत आणि लाज वाटते.आमचं नं मनच स्थिर नाही आहे.आम्ही माणूस स्वीकारायला कधीच तयार नसतो.आम्ही माणूस तपासत असतो.मुद्दाम परिस्थिती निर्माण करतो कि तो चुकेल.मग दबा धरून बसतो.चुकतो का चुकतो का.मग बोंब ठोकतो आणि मग ब्रेकअप करतो.

आमचं मन पेंडूलम सारखं असते.झुलत झुलत.मित्र आज तिला घसा कोरडा होईपर्यंत शिव्या देतो.उद्या ती किती भारी आहे ते पटवून सांगतो आणि त्याचा प्रेम खरं कसं आहे हे सांगायचा केविलवाणा प्रयत्न करतो.परवा ब्रेकअप करतो.

पण आता खरच कंटाळा आला,कीव आली आहे…….आणि थोडीशी किळस पण……

१ प्रतिक्रिया

Filed under सहज