जीव गळून जाता, धैर्य विरून जाता,
हात सावरता, देतोस तू……
आयुष्याची घडी, जर का विस्कटली थोडी,
वाहतसे भरून दुथडी, करून तुझी..
ना गरज मागण्याची, न् देरी सांगण्याची,
दखल मागण्यांची , तू घेतसे…….
सर्वत्र अंधकार, आयुश्यि हाहाकार,
तव दीप निराकार, तेवतसे………
मिटल्या सर्व शंका, विश्वास भरुनी आला,
तुवा सर्वज्ञाला, सर्व दिसतसे………
vah!!