प्रेम आणि दयनीयता या शब्दांचा खरे पाहता काहीच संबंध नाही. जो माणूस प्रेमात असतो तो दयनीयतेपासून दूर असतो. प्रेम माणसाची दयनीयता मिटवते. पण आज समाजात उलटंच चित्र दिसते. प्रेमात पडलेला माणूस खरच दयनीय असतो. गेल्या काही वर्षात कित्येक प्रेमी पाहिलेत, कित्येक प्रेम प्रकरणे पहिलीत. पण प्रेमात पडलेला एकही मित्र मला मला खूश दिसला नाही. काही प्रेमाची अवस्था इतकी दयनीय असावी?
सर्व प्रथम, ज्याला आपण प्रेम म्हणतो, ते प्रेम नव्हेच. हल्ली लोकं एकाकीपणा घालवायला प्रेमात पडतात.किंबहुना, एकटे राहण्याची लोकांची तयारी नसते. म्हणून ते प्रेम शोधतात. आजची आमची पिढी त्रस्त आहे. जगात ताण तणाव निर्माण करणाऱ्या खूप गोष्टी आहेत. आणि मग कोणीतरी हे सगळं समजून घ्यावं असं वाटतं. कोणीतरी असं लागतं ज्याला हे सगळं सांगत येईल. इथून प्रेमाची सुरुवात होते.
आज ९०% उदाहरणांमध्ये प्रेम हे प्रेमातून नाही, तर मानसिक दौर्बल्यातून उदयास येते. आज समाजात तरुणांची जी दयनीय अवस्था दिसून येते, तिला जबाबदार प्रेम नाही, तर मानसिक दौर्बल्य आहे.
तुम्ही बरोबर लिहिले आहे, आज ची पिढी पैसे कमावण्यात गर्क आहे, आणि एकाकीपण घालवण्या साठी जोडीदार निवडतात, ज्याला प्रेम मानता येणार नाही.
आणि हे मानसिक दुर्बल्याचे लक्षण तुम्ही बरोबर अधोरेखित केले आहे.
पण असे कोणी मुद्दाम करत नाही, हे आसे का झाले आहे? त्याला काय कारण आहे?
आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी जोडीदार हवा असतो.
thodakach lihil aahes pan dolaspanane.