तर ज्ञानाची किंमत काय?

गेली कित्येक वर्षे अध्यात्माचा वाचन सुरु आहे. कित्येक तत्वज्ञ आणि विचारवंत वाचलेत. त्यांच्याजवळ ज्ञान आहे हे मान्य. हे ज्ञान त्यांच्या जवळ शाश्वत पणे टिकून राहणार हे पण खरे. पण या सर्व विचार्वातान्मध्ले ९०% इतके कठीण लिखाण करतात कि सर्व सामान्य माणसांना त्या ज्ञानाचा खीच उपयोग होत नही. उलट, लोकं अध्यात्म पासून दूर पळू लागतात. आवड निर्माण होण्या ऐवजी भीती आणि दुरावा निर्माण होतो.

या बाबतीत रजनीशांना खरच तोड नही. इतकं साध आणि सहज लिखाण या पृथ्वीवर दुसऱ्या कोणाचचं नही असं म्हंटल तर ती अतिशयोक्ती होणार नही. उपनिषदांवर कित्येक संतांनी व विचारवंतांनी लिखाण केले आहे. पण इतर विचारवंतांची पुस्तके काही पणे वाचली कि फेकून द्यावीशी वाटतात. नही फेकावीशी तरी निदान दूर करावीशी तरी वाटतात. मी रजनीश यांनी लिहिलेले कित्येक उपनिषद वाचले आहेत. ठेवायचे म्हंटले तरी ते संपवल्या शिवाय ठेवल्या जात नाहीत.

रजनीश यांना खूप जास्त सामंजस्य होते. लोकं क्लिष्ट गोष्टी वाचत नही हे त्यांना बरोबर ज्ञात होते. कित्येक वेळा त्यांच्या पुस्तकात विनोदांचा अतिशय जास्त वापर केलेला दिसून येतो.आणि मला ते पटते पण. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यापेक्षा त्यांना हसवून हसवून ज्ञानी करणे योग्य. अगदीच उदाहरण द्यायचे झाल्यास योगी अरविंद यांनी लिहिलेले उपनिषद वाचायचा प्रयत्न करावा. श्री अरविंद यांच्या ज्ञानाबद्दल काहीच शंका नाही पण लिहिण्याची पद्धत फार क्लिष्ट आहे. ओळींचा अर्थ लागत नही. एक एक ओळ कितीतरी वेळा वाचावी लागते. ओशो यांच्या लिखाणाचा ओघ हा एखाद्या नदीसारखा आहे. तीत उडी मारली कि आपोआप भ्रमंती करून अन्ते.

मला असे प्रामाणिक पणे वाटते, कि ओशो यांच्या ज्ञानाचे मूल्य सर्वाधिक आहे कारण कि ते सरळ आहे आणि सुलभ आहे.

2 प्रतिक्रिया

Filed under विश्वाचे आर्त

2 Responses to तर ज्ञानाची किंमत काय?

  1. मनोहर

    उपनिषदांत ऋषिमुनीनी आपल्याला झालेले साक्षात्कार वर्णन केलेले आहेत. त्यावर त्यानी विशेष टीकाटिप्पणी सेलेली नाही वा ते साक्षात्कार इतरानी आपल्याला झाले त्याच स्वरूपात स्वीकारावेत असा आग्रहदेखील धरलेला नाही. उपनिषदांवर टीका लिहिणाऱ्यानी मात्र आपल्या सांप्रदायिक तत्त्वज्ञानाच्या चौकटीतच या साक्षात्कारांचा अर्थ लावला जावा असा आग्रह धरला आहे. रजनीशदेखील त्याला अपवाद नाहीत.

  2. रजनीश हे त्यांनी लावलेल्या अर्थाबाबत आग्रही होते असं मला स्वतःला तरी कधी त्यांच लिखाण वाचून जाणवल नही. पण त्यांचे भक्त केवल त्यांचेच लिखाण बरोबर अशी भूमिका बाळगतात हे मी कबूल करतो आणि ते चुकीचे आहे याची पण मला जाणीव आहे. स्वतः रजनीश यांनी मात्र कधीही स्वतःच्या विचारसरणीला लोकांवर दाबलं नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s