पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी कलारंजनी नावाचा एक अतिशय सुंदर राग निर्मिला आहे. गेले कित्येक वर्षे हा राग माझ्या मनाला भुरळ घालतो आहे. भरपूर मेहनत घेतल्यावर या रागीणीची जन्मकथा मला कळली.
हा राग पंडित हरिप्रसादचौरसिया यांनी ओशो यांना वाढदिवसाची भेट म्हणून समर्पित केलं होता. ओशो नि आपलं वादन ऐकावा म्हणून हरिप्रसाद चौरसिया खास वेळ काढून जात असत. दोघांमध्ये गाढ आणि गूढ स्नेह होता. ओशोंच्या कित्येक ध्यान पद्धतींना संगीत हरिप्रसाद चौरसिया देतात. राग कालारांजनी हे कलावती आणि शिवरंजनी या अतिशय गोड रागांच मिश्रण आहे. पझेशन नावाच्या अल्बम च्या रुपाने हा वाढदिवशी समर्पित केलेला राग आपल्याला ऐकायला मिळू शकतो.
तबल्यावर आहेत झाकीर हुसैन.सुरुवातीला अतिशय गंभीरपणे चालत जाणारा हा राग, शेवटी प्रेक्षकांना आनंदाच्या परमोच्च शिखरावर घेऊन जातो. वेगवान ताना, झाकीर हुसैन यांच्या पेश्काशी दोघांचा दैवी समन्वय…या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एक उच्चतम सांगीतिक अनुभव.
मी कलारंजनी ऐकत असताना डोळ्यांसमोर येतात ते ओशोंचे डोळे…….