ओशोच्या मार्मिक गोष्टी – शतपदीची गोष्ट
ओशोने आपल्या हजारो प्रवचनांमधून कितीतरी अतिशय मार्मिक अशा गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातल्याच काही गोष्टी यापुढे आपल्यासमोर मी मांडत जाणार आहे. सुरुवात करतो ती शतपदीच्या गोष्टीने.
एकेकाळी एक शंभर पायांचा शतपदी नावाचा जनावर जंगलात मुक्तपणे संचार करत असायचा. आपल्या शंभर पायांच्या मदतीने अख्खे जंगल तो पादाक्रांत करायचा.एकदा कोणी एक उंदीर गावातून जंगलात आला. उंदीर मोठ हुशार होतं. शास्त्र त्याच्या तोंडावर होते. वेद-पुराण मुखोद्गत होते. असा हा उंदीर साऱ्या गावात विद्वान म्हणून नावाजलेला होता.
जंगलात आल्या आल्या उन्दिराची भेट होते ती या शतपदिशी. त्याला पाहता पाहताच विद्वान उंदीर विचार करू लागतो. काय हा प्राणी….शंभर पाय. कसेकाय याच्या लक्षात राहत असेल कोणता पाय आधी उचलायचा आणि कोणता नंतर काय माहित. याला विचारायलाच हवे.
उंदीर लगेच शतपदिला गाठतो.त्याला प्रश्न विचारतो कि मित्र, तुला कस काय लक्षात राहता कुठला पाय आधी उचलायचा आणि कुठला नंतर?ज्यार्थी तू शंभर पायांनी इतकं भरभर चालतो, तुझे विचार तर खूपच प्रगल्भ असतील. शतपदी म्हणतो कि मी चालताना कधी असं विचारच नही केला. आता करून बघतो. शतपदी विचार करू लागताच एका पाव्लातच धडपडून खाली कोसळला होता.
ओशो म्हणतात, खूप वेळा अति विचार हाच माणसासमोर मोठे प्रश्न बनून जातो. कमी विचार करा…….
नेणिवेमधील बाबी जाणिवेत आणण्याने फक्त अडचणीत भर पडते हा या कथेचा अर्थ असावा. नेणीव हा परंपरेने आपल्याकडे आलेला जाणिवांचा साठा आहे. त्यावर फार विचार करण्याची जरूर नाही.
अगदी बरोबर! पण माणूस हा इथेच चुकतो…..नको त्या गोष्टींचा विचार करू लागतो…अशा करूयात कि माणूस कमी विचार करेल….
kami v4 karava pan kuthe? sagalikade tar nahich!
मस्त लेख !ओशोंचे लिखाण कधी वाचण्यात आले नाही .बोधपूर्ण लेख .