एका संस्कृत सुभाषितात असं उल्लेख आहे कि जे लोकंआशेचे दास आहेत ते सर्व जगाचे दास आहेत. आज सगळे जग धावते आहे ते आशेच्या मागे. उमराव असो किंवा रस्त्यावरील कोणी भिकारी. आशा सगळ्यांनाच असते. जे नाही आहे, त्याचे स्वप्न म्हणजे आशा.
अध्यात्मात आशेचा त्याग करण्यावर खूप भर देण्यात आला आहे. सामान्यतः आशेपासून मुक्त होणे म्हणजे निराश होणे असं सर्वांचा गैरसमज आहे. हेच कारण आहे कि भारतीय संत हे परदेशात pessimistic म्हणून संबोधले जातात. पण भारतीय संत हे निराशा वादी नसून ते आशामुक्त आहेत. आशामुक्त असणे आणि निराशावादी असणे यात फार मोठा फरक आहे. जो हरलेला असतो तो निराशावादी असतो. ज्याची आशा पूर्ण होत नाही, तो निराशावादी असतो.आशा मुक्त माणूस हा आशेपासून मुक्त झाला असतो. निराशावादी माणूस आशेचा गुलाम असतोच.आशामुक्त माणूस हा आशेच्या पलीकडे गेलेला असतो….
खूपच छान लिखाण !
आशा आणि निराशा याना कोणत्या प्रकारच्या मर्यादा आहेत ही बाब आपण पुरेशी स्पष्ट केलेली नाही.