संगीत आणि त्यात हि वाद्य संगीत हि एक उच्च दर्ज्याची कला आहे. सर्व वाद्यांमध्ये, बासरी हि काठीण्तम. कृष्णाच्ये बासरीची खूप वर्णने ऐकली आहेत. गेल्या काळात पंडित पन्नालाल घोष यांनी बासरीला एक नवीन आवाज मिळवून दिला. केवळ एक पोकळ बांबू, अवघ्या विश्वाला वेड घालू लागला. पण काहीतरी कमी या बासरीमध्ये जाणवत होती. हि कमी भरून काढायला जणू काही साक्षात भगवान कृष्णाच पृथ्वीवर आले असावेत.
हरीप्रसाद चौरासिया, हि एक जादू आहे, एक वेड आहे, एक ध्यान आहे, एक धुनी आहे. आत्मसाक्षात्काराची एक खिडकी आहे. निर्गुणाचे द्वार आहे. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्याबद्दल बोलता बोलता भगवान रजनीश अर्थात ओशो यांनी खालील प्रमाणे उद्गार काढले आहेत-
“एक थंड पाण्याचा प्रवाह आहे. अतिशय वेगवान. कोणीतरी तो पार करते आहे. पाणी प्रचंड थंड आहे. त्यामुळे अतिशय वेगन जाने गरजेचे आहे. पण त्याचबरोबर, प्रवाह वेगवान आहे. त्यामुळे अतिशय जागरूकपणे, सय्यमाने पाऊले टाकायची आहेत. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे वादन हे या चालण्याच्या प्रक्रीये प्रमाणे आहे. त्यात गती आहे, तेज आहे, ओघ आहे पण ते अतिशय स्थिर आहे. भरकटत नाही.सटकत नाही.”
या ठिकाणी मला आठवते ती बरखा रितू नावाची हरिप्रसाद चौरासिया यांची संगीत संध्या. पंडित जी ठाकले आहेत हे दिसत होते, पण त्या वादनात दरारा होता, ते कमकुवत नवते. विजेच्या कडकटाला वर्य्च्या घोंघावत्या ओघाने क्षणात गप्प करावे त्या प्रमाणे हि बासरी पाख्वाजाला थोपवत होती. मी चिंब ओळ झालो होतो. आयुष्यात अनेक मल्हार ऐकलेत. पण कुठल्याच मल्हार ने कधी इतके भिजवले नाही. मनाला इतका ओलावा दिला नाही. पंडित हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी हि मला साक्षात नाद-ब्रह्माचे मूर्तिमंत रूप आहे. त्यांचा तींत ओतल्या गेलेला एक एक श्वास हि त्या प्रती क्षण प्रती कान निवासकाने केलेल्या ध्यानाचा एक एक क्षण वाटतो.
Khup chhan!!!
aho mag ekahda youtube kinva audio file taka ki amhala pan malhar madhe chib hou dya !