जगात असे कितीतरी शब्द असतात कि माणसांनी ज्यांचा अक्षरशः अपमान केला आहे.याच सर्व शब्दांतला एक शब्द म्हणजे प्रेम.प्रेम हल्ली फारच स्वस्त झालं आहे.इतकं कि २० वर्षाचे होईपर्यंत लोक चार पाच वेळा प्रेमात पडलेले असतात.लोकांना प्रेम उमजायला आयुष्य वेचावं लागतं असं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतं.पण हल्लीची हि सगळी गम्मत बघता प्रेमाची अत्यल्प दरात विक्री होत असावी असच वाटून राहिलं आहे.
अरे लेका मंदार,काय सांगू तुला,लई भारी आहे पोरगी…………अरे तशी चांगली आहे पण जरा विचित्रच आहे………….कशी का असेना,दिसायला कडक………..नुसतं दिसणं काय चाटणार?माणसाला मन हवं रे मंद्या……….बघू,विचार चालू आहे हि कि ती………..हल्ली माझं आणि हिचं,पटतच नाही……..ब्रेकअप….परत नवी पोरगी….नवे कौतुक….नवे प्रेम….नवी गाऱ्हाणी…आणि परत नवा ब्रेकअप……
या दोन महिन्यात मी चार ब्रेकअप पाहिलेत.अगदी जवळच्या लोकांचे.आधी फार वाईट वाटायचं पण आता फक्त खंत आणि लाज वाटते.आमचं नं मनच स्थिर नाही आहे.आम्ही माणूस स्वीकारायला कधीच तयार नसतो.आम्ही माणूस तपासत असतो.मुद्दाम परिस्थिती निर्माण करतो कि तो चुकेल.मग दबा धरून बसतो.चुकतो का चुकतो का.मग बोंब ठोकतो आणि मग ब्रेकअप करतो.
आमचं मन पेंडूलम सारखं असते.झुलत झुलत.मित्र आज तिला घसा कोरडा होईपर्यंत शिव्या देतो.उद्या ती किती भारी आहे ते पटवून सांगतो आणि त्याचा प्रेम खरं कसं आहे हे सांगायचा केविलवाणा प्रयत्न करतो.परवा ब्रेकअप करतो.
पण आता खरच कंटाळा आला,कीव आली आहे…….आणि थोडीशी किळस पण……
atishay sundar(zakas)zalay likhan