न दिसतसे मज कोणी दुसरा

हा दोष तुझ्या नजरेचा…

विलगतेचे पडदे सारे

भेदाचे सारे पसारे

अशक्य जे जाणे विचारे

न् दिसे आसपास

हा दोष तुझ्या  नजरेचा…..

 

भेद अंतरीचे

कल्लोळ मनीचे

आभास जगीचे

क्षणात विरून जाती….

हा दोष तुझ्या नजरेचा…..

दु:ख सारे विरले

संशय न् उरले

प्रेममय चित्त उरले

नसे कारण यास ……

हा दोष तुझ्या नजरेचा…….

प्रतिक्रिया नोंदवा

Filed under कविता, विश्वाचे आर्त

हात सावरता

जीव गळून जाता, धैर्य विरून जाता,

हात सावरता, देतोस तू……

आयुष्याची घडी, जर का  विस्कटली थोडी,

वाहतसे भरून दुथडी, करून तुझी..

ना गरज मागण्याची, न् देरी सांगण्याची,

दखल मागण्यांची , तू घेतसे…….

सर्वत्र अंधकार, आयुश्यि हाहाकार,

तव दीप निराकार, तेवतसे………

मिटल्या सर्व शंका, विश्वास भरुनी आला,

तुवा सर्वज्ञाला, सर्व दिसतसे………

 

१ प्रतिक्रिया

Filed under कविता, विश्वाचे आर्त

प्रेमाची दयनीय अवस्था

प्रेम आणि दयनीयता या शब्दांचा खरे पाहता काहीच संबंध नाही. जो माणूस प्रेमात असतो तो दयनीयतेपासून दूर असतो. प्रेम माणसाची दयनीयता मिटवते. पण आज समाजात उलटंच चित्र दिसते. प्रेमात पडलेला माणूस खरच दयनीय असतो. गेल्या काही वर्षात कित्येक प्रेमी पाहिलेत, कित्येक प्रेम प्रकरणे पहिलीत. पण प्रेमात पडलेला एकही मित्र मला मला खूश दिसला नाही. काही प्रेमाची अवस्था इतकी दयनीय असावी?

सर्व प्रथम, ज्याला आपण प्रेम म्हणतो, ते प्रेम नव्हेच. हल्ली लोकं एकाकीपणा घालवायला प्रेमात पडतात.किंबहुना, एकटे राहण्याची लोकांची तयारी नसते. म्हणून ते प्रेम शोधतात. आजची आमची पिढी त्रस्त आहे. जगात ताण  तणाव  निर्माण करणाऱ्या खूप गोष्टी आहेत. आणि मग कोणीतरी हे सगळं समजून घ्यावं असं वाटतं. कोणीतरी असं लागतं ज्याला हे सगळं सांगत येईल. इथून प्रेमाची सुरुवात होते.

आज ९०% उदाहरणांमध्ये प्रेम हे प्रेमातून नाही, तर मानसिक दौर्बल्यातून उदयास येते. आज समाजात तरुणांची जी दयनीय अवस्था दिसून येते, तिला जबाबदार प्रेम नाही, तर मानसिक दौर्बल्य आहे.

3 प्रतिक्रिया

Filed under सहज

पंडित अनिन्दो चटर्जी : एक रम्य संध्याकाळ…..

आमची पिढी खरे पाहता तबला सोलो बैठकी ऐकण्याच्या बाबतीत फारशी नशीबवान नाही. अगदीच थोड्याफार मेह्फिली होतात. त्यातल्याही काहीच पुण्यात. तबल्याची जादू, लेह्र्याची नजाकत, चक्रधार हे सगळं कधी प्रत्यक्ष ऐकायला मिळेल कि नाही असे वाटायचे. पण इच्छा प्रामाणिक असल्या, कि त्या पूर्ण होतात हे हरिप्रसाद चौरासिया यांनी एकदा मला सांगितले होते. त्याचीच प्रचीती परवा अलि.

पंडित अनिन्दो चटर्जी यांना कित्येक मान्यवरांना साथ करतांना अनेकदा ऐकले आहे. पुण्यात त्यांच्या एकाल वादनाचा कार्यक्रम आहे हे कळतच पाय तिकडे वळले. मी कमीत कमी १० गावांमध्ये वाढलो आहे. वडलांची फिरतीची नोकरी यास कारणीभूत. हे मला पण प्रामाणिकपणे मान्य करावेसे वाटते कि पुण्यासारखे रसिक कुठे नाहीत. खरच नाहीत. साडे नौ चा  कार्यक्रम. तिकीट विक्री रात्री नऊ वाजता सुरु होणार होती. मी प्रतिसादाबद्दल साशंक होतो. पण अर्ध्या तासात सभागृह पूर्ण भरले.

सुरुवातीस अर्धा तास अनींदो चटर्जी यांना काही प्रश्न विचारण्यात आलेत. त्या प्रश्नांच्या उत्तरांमधून त्यांचा विनम्र स्वभाव आणि गुरुजनान्विषयी असणारा आदर लगेच दिसला. एवढा मोठा कलाकार पण श्रोत्यांची परवानगी आहे का अशी विचारणा सुरुवातीस करतो हे बघून खरच सुंदर वाटलं.

त्यांनी सुरुवात केली ती रुपक तालाने. सात मात्रांचा हा ताल खरच मनाला वेद लावतो. पेटीवर हात पडताच दाद उठली. संथ पण अतिशय तेजपूर्ण पद्ध्तीने अनिन्दो जींनी वादन सुरु केले. त्यांचा स्थिर हाथ खरच विशेष आहे, वेगळा आहे. लय वाढू लागली. रचना अधिक अधिक कठीण होत गेल्यात. पण स्थैर्य, स्पष्टता तशीच होती. नंतर पंडितजींनी तीनताल वाजवला. आपल्या एका शिष्याला देखील त्यांनी मंचावर बोलावून तालीम दिली. समता प्रसाद त्याचबरोबर अन्य कितीतरी मान्यवरांच्या रचना त्यांनी सदर केल्यात.

रात्री साडे बारा पर्यंत ही ताल यात्रा सुरु होती. माझी इच्छा खरच पूर्ण झाली. लेहरा, तानपुरा, पेशकार, कायदे, रेले, चक्रधार…..

3 प्रतिक्रिया

Filed under नाद ब्रह्म

कहे कबीर……

कबीर ही एक माझी अतिशय आवडती व्यक्ती. खरे पाहता, कबीर ला व्यक्ती म्हणणे ही एक चूक आहे. कबीर ही कोणी व्यक्ती नव्हती, तर ते एक अस्थित्व होतं. आयुष्यातल्या कित्येक शाश्वत गोष्टी ज्या मोठ्या मोठ्या विचारवंतांना कळू नाही शकल्या, त्या कबीरांनी अनुभवल्या होत्या.

हे एक त्यातीलच शाश्वत सत्य-

माटी कहे कुम्हार से, तु क्या रोंदे मोय ।

एक दि ऐसा आएगा, मै रोन्दुंगी तोय

प्रत्येकाचे दिवस असतात. माणसाचे पण आणि मातीचे पण. कुंभार तर मातीला पायदळी तुडवतो, मळतोच. पण एक दिवस असं येतोच, कि तो स्वतः पण या मातीतच जातो. गर्व भावना नको. मुंगुस मुंग्या खाण्यात अतिशय पटाईत असतो. पण याच मुंगसाला तो मेला, कि मुंग्या खातात. हा विश्वाचा नियम आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. म्हणून, गर्व नको. कुठला माणूस आपल्या तुलनेत थोडा कमी पातळीचा असला तरी त्या माणसाबद्दल नीच भाव नको. खरं पाहता, जगात ना तर कोणी वर आहे ना तर कोणी खाली. प्रत्येक माणूस आपल्या जागी विराजमान आहे. वरचा आणि खालचा हे सगळे माणसाचे खेळ आहेत……

१ प्रतिक्रिया

Filed under कबीर

शब्द शेवटचे…दोघा महापुरुषांचे…..

गौतम बुद्ध आयुष्यभर हजारो अनुयायांशी शब्द संवाद साधत होते, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत होते. महापरिनिर्वाण समयी, गौतम बुद्धांनी उच्चारलेला शेवटचा शब्द होता सम्मसती. हेच शब्द अजून एका महापुरुषाने आपल्या शेवटच्या बोलण्यात सांगितले होते. याला योगायोग म्हणावे कि काय?

ओशो यांच्या शेवटच्या प्रवचनातील हे शब्द-

“गौतम बुद्धाचे शेवटचे शब्द होते, सम्मसती नेहमी लक्षात ठेवा, कि तुम्ही पण बुद्धच आहात……..सम्मसती”

यानंतर दोन दिवसांनी ओशोंनी देह ठेवला. वरील वाक्य हे त्यांच शेवटच वाक्य. दोघा प्रबुद्ध माणसांनी एकाच शब्द बोलून आपला प्रवास संपवणे हा योगायोग आहे हे मान्य करायला कठीण जाते. सर्व संतांचा आयुष्यभर एकाच गोष्टीवर भर होता- तुम्हीच परमेश्वर आहात.तुमच्या आतच ती मूर्ती दडली आहे. शोध आत घ्या. मन बाहेर पळत सुटते. सारखं बाहेर शोध घ्यायला सुरुवात करते. म्हणून, सारखं सांगावं लागते माणसाला- तूच बुद्ध आहेस. आत शोध. बाहेर नको पळूस. आत बघ. सगळं काही आत दडल आहे.

आयुष्यभर बुद्ध सम्मसती चा उपदेश देत होते. ओशोंनी पण आयुष्यभर आतमध्ये शोध घ्यायला सांगितला.माणसाची बाहेर पळण्याची वृत्त्ती किती प्रबळ आहे याची दोघांनाही जाण असावी……

प्रतिक्रिया नोंदवा

Filed under विश्वाचे आर्त

कोण?

कोण फुंकीतो सारा, हा बासरीतून वारा,

अन् क्षणात निर्मितो, हा विश्व पसारा….

हे नेत्र कोणाचे, जे बघती स्वप्न या विश्वाचे,

डोळे ना उघडिता, ढाळीती बिंदू दवाचे……

हा श्वास कोणाचा जो सामावला साऱ्या जीवांतून,

अन् वाहतो अजीवातून, शांत अन् अदृश्य….

हे हात कोणाचे, जे सावरती सत्यास,

भुकेल्या जीवास अन् आस असेल त्यास…

मी हा शोध कुणाचा घेतो, अन् कोण हा शोध घेतो?

जगात जर दुसरा नाही कुणी, तर शोध जन्मास का येतो?

कोण बरे हा कुठे हा वसला?

याच्याच शोधात, हर एक फसला…..

3 प्रतिक्रिया

Filed under कविता, विश्वाचे आर्त